खरंच देव आहे का ? 

kharach dev aahe ka

असा प्रश्न पडणाऱ्याने हे नकी वाचावे 

kharach dev aahe ka? 

तुम्हाला विचार करायला लावणारी पोस्ट नकी वाचा 

एका ओळीत उत्तर .... 

नमस्कार मित्रांनो,

खरंच देव आहे का ? 

तुम्हाला पोस्ट च्या टायटल आणि थमनेल वरून आज आपण कश्या संदर्भात (वरती) बोलणार आहोत हे नक्कीच कळले असेल. 

खरंच देव आहे का? कोण ठरवतं आपले पाप आणि पुण्य? 

असा प्रश्न मला का पडला! माझ्या बाबांना हृदय विकाराचा त्रास झाला म्हणजेच हार्ट अटॅक आला तेव्हा आम्ही त्यांना पुण्याच्या एका प्रसिध्द रुग्णालयात बायपास ह्या सर्जरी साठी भरती केले होते. तेव्हा आम्ही सर्व कुटुंब तिथे उपस्थित होते. त्यादिवशी रात्री ९ .०० ते ९. ३० चा टाइम असावा मी नेहमी प्रमाणे त्या दवाखाण्यात प्रवेश करताना तेथील श्री गणेश भगवान च्या मुर्तीचे दर्शन घेऊन पुढे बाबांना भेटायला जायचो. पण त्या दिवशी मी खुप अस्वस्थ होतो कारण माझ्या बरोबर एक घटना घडली होती आणि ती चांगल्या प्रकारे कुणाची हि हानी न होता सुटल्या गेली, तेव्हा मी देवाचे धन्यवाद आणि वडिलांना लवकर बरे लागावे म्हणुन प्रार्थना केली. 

मी देव दर्शन घेत असताना एक आवाज कानावर पडला " काय बोलला देव " मी इकडे तिकडे बघितले तर एक ५० शीतल गोरा उंच वेल एज्युकेटेड व्यक्ती त्या दरवाज्याच्या साईडला अंधार पडलेल्या बाकड्यावर मस्त पायावर पाय देऊन बसला होता आणि माझ्या कडे बगुन हसत होता तोडा क्षण मला त्याला काय उत्तर द्यावे हे कळलेच नाही, पण नंतर मी देखील एक स्मित हास्य करून माझे बुट घालण्यासाठी त्याच्या शेजारी जाऊन बसलो आणि त्या नंतर मी इंग्लिश मध्ये बोलला  The idol is just the medium to gain the power to fight your emotions and your situation again. "आपल्या भावना आणि आपल्या परिस्थितीशी पुन्हा संघर्ष करण्याची शक्ती मिळवण्यासाठी फक्त एक माध्यम हे मूर्ति" त्यानंतर मी त्याच्याशी गप्पा मारायला लागलो.

तो खुप पैसेवाला होता हे मला त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या विचार क्षमतेतुन समजले. तो देखील पोटाच्या ट्रीटमेंट साठी आला होता त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती त्याची पत्नी आणि दोन मुले नोएडा ला होती. तो एकटाच आला होता त्याच्या सोबत त्याचा ड्राइवर होता आणि सर्व दवाखान्याची ऍडमिशन प्रोसेस तो ड्राइव्हरच करत होता. हे सगळे मी बघत होतो तो खुप निराश होता कारण त्याची काळजी घेण्यासाठी कोणीच नव्हते. मी बराच वेळ त्याच्याशी गप्पा मारल्या आणि आमच्या गप्पा चालू असताना माझ्या मनात पुन्हा तोच प्रश्न पडला कि जर ही व्यक्ती किती चांगली वागते बोलते तर त्याच्या बरोबर असे का घडले. तेव्हा तो मला बोलला कि मी देखील देवावर विश्वास ठेवतो आणि मुर्तीच्या पाया पडतो परंतु त्यातुन तो माझी इच्छा पुर्ण करतोच असे नाही पण मला एक मानसिक समाधान मिळते कि कोणीतरी आपल्या पाठीशी आहे आणि तो आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढेल मार्ग दाखवेल आणि सर्व सुरळीत चालु होईल.


अशा अनेक गोष्टी आणि परिमाणे त्याने मला सांगितली त्याचा खडतर प्रवास सांगितला. तेव्हा मला प्रश्न पडला कि हे सर्व घडवतो कोण? त्याला याचा काय फायदा? मी असण्याचा किंवा नसण्याचा काय फायदा? असे अनेक  ...... ???????? पडत गेले . आणि त्या नंतर मी त्याचे उत्तर शोधण्यास सुरवात केली. 

  तेव्हा, मी आज दोन्ही बाजु मांडणार आहे. ह्या जगात देव असण्याचे अनेक प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष रित्या सिध्द झाले आहे. आपल्या पैकी कित्येकान बरोबर काही चांगले घडले कि आपण ते सर्व माझ्या नशिबाने आणि मी केलेल्या माझ्या आयुष्यातील चांगल्या कामाचे फळ होते. आणि मग तेच जर वाईट घडले तर आपण ( मी येथे सर्वांना समाविष्ट करत नाही ) किंवा आपल्या मनाविरुध्द घडले कि बोलुन किंवा देवाला दोष  देऊन मोकळे होतो. 

जर आपण नेहमीच सर्वांशी चांगले वागतो कुणाचे वाईट करत नाही, कुणाचे वाईट होऊ नये हा विचार देखील करत नाही, कुणाच्या वाईट करण्यात प्रत्येक्ष व अप्रत्येक्ष सहभाग नसतो  मग "माझ्या बरोबरचं वाईट का होते ?. असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. 

दैनंदिन जीवनात आपण आपल्या जवाबदाऱ्या प्रामाणिक पणे पार पाडत असतो, मग त्या जवाबदाऱ्या पार पाडताना आपल्या हातुन अनेक वेळा कळत नकळत काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडत असतात. त्या पैकी आपल्याला कळत नाही किंवा आपल्याला त्या जवाबदाऱ्या पारपाडतांना जाणुन बुजवून काम करावे लागते, इथेच आपल्या हातुन काही ना काही प्रमाणात वाईट गोष्टी घडतात. ( मग त्या छोट्या किंवा मोठ्या आसु शकतात ) मग त्या वाईट घडलेल्या गोष्टी मुळेच आपल्या सोबत वाईट होतं का? पण जर ते व्यावहारिक असेल उदा . जर मी एखादी वस्तु १० रुपयांना आणली आणि ती मी १५ रुपयांना विकली तर मी ती त्याला जास्त किंमतीत विकली मग यात मी चांगला वागलो कि वाईट, जर मी चांगला असेल तर...  आणि वाईट असेल तर। .... 

मी त्याला एक प्रश्न विचारला की "देव असण्याचा किंवा नसण्याच्या तुम्हाला काही फरक पड्तो का? "

   मित्रांनो तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारला तर "देव असण्याचा किंवा नसण्याच्या तुम्हाला काही फरक पड्तो का? " बहुतेक जनाचे उत्तर - तर याचे उत्तर कोणी 'हो मला पडतो' असे देईल आणि कोणी 'नाही पडत' असे देईल. पण त्याने मला खुप छान उत्तर दिले। तुला मित्र आहे का, तर मि बोललो हो आहे तर! त्यातुन तुझा कोणता मित्र चांगला आहे आणि कोणता मित्र वाईट. कोणता मित्र आपल्या वाईट परिस्तितीत आपल्या बरोबर असणार आणि कोणता नाही हे तुला कसे समजेल ? कोणत्या मित्रांचा स्वभाव कसा आहे हे तुला कधी समजणार? असे अनेक प्रश्न त्याने मला विचारले. त्या सर्व प्रश्न ऐकल्या नंतर मी त्याला सांगितले कि जेव्हा मी त्याच्या बरोबर असतो तेव्हा मी त्याचे निरीक्षण (observation ) करतो. तेव्हा त्याने मला सांगितले कि हेच मित्राशी जवळीक साधण्याचे आणखी काय फायदे आहेत? आपण त्याच्याशी मनातील बोलु शकतो. तो आपलं ऐकेल आणि आपल्या मदतीला धावून येईल याची खातरी आपण बाळगु शकतो. मित्रांशी जवळचा नातेसंबध जोडल्याने एखादया गोष्टीबद्दल तो कसा विचार करतो हे आपल्याला समजु शकत: असे अनेक चांगले वाईट त्याला सांगितले त्यानंतर तो बोलला त्याचे उत्तर खुपच सोपे आणि सरळ होते. 


खरंच देव आहे का ? 
मग जर आपण देवाशी मित्रानं सारखे संबध ठेवले किंवा त्याच्या जवळ गेलो तरच आपल्या देव कसा आहे, तो काय करतो, तो कसा विचार करतो, .... समजेल आणि आपण तसे वागतो. 

खरंच देव आहे का ? 

जगातले कधीही न उलगड नारे सत्य ........ 

खरंच देव आहे का ?