Breaking News
Loading...

Connected

Responsive Ad

Neta ksa asava

नेता कसा असावा 

(Neta Ksa Asava) 

नेता कसा असावा Neta Ksa Asawa

नव्या नेतृत्वाची गरजएकदा एक घोडेस्वार जंगलातून चालला होता. काही सैनिक लाकडाचे ओंडके गाडीत भरण्याचे काम करीत होते. एक अत्यंत जड ओंडका उचलण्याकरिता ते धडपड करीत होते. त्यांचा वरिष्ठ अधिकारी जवळच उभा होता. त्या घोडेस्वाराने त्याला विचारले, ‘‘तुम्ही सैनिकांना मदत का करत नाही?’’ तो अधिकारी म्हणाला, ‘‘मी अधिकारी आहे, त्यांच्याकडून काम करवून घेणे ही माझी जबाबदारी आहे. मी आदेश देतो.’’ तो घोडेस्वार खाली उतरला. सैनिकांना त्याने ओंडका उचलायला मदत केली. पुन्हा घोड्यावर बसला, त्या अधिकार्याजवळ गेला आणि म्हणाला, ‘‘पुढच्या वेळी जेव्हा तुझ्या माणसांना मदतीची गरज भासेल तेव्हा सेनापतीला बोलवा.’’ तो अधिकारी चपापला. चौकशी केल्यानंतर त्याला समजले की तो सेनापती जॉर्ज वॉशिंग्टन होता. हा असतो नेतृत्वाचा जन्मजात गुण. सैनिकांना प्रत्यक्ष मदत करण्याची ही वेळ आहे, हे ज्याला जाणवत नाही, तो त्यांचा खरेच अधिकारी असतो का? काम आणि ती करणारी माणसं, यापेक्षा ज्याच्या डोक्यात पद आणि आदेश याच गोष्टींना अधिक स्थान असते, तो त्या कामाला न्याय देऊ शकतो का?
नेता कसा असावा (Neta Ksa Asava) 

सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा एकदा नेल्कोच्या अधिकार्यांसह काही कामाकरिता नाशिकला वाहनाने जात होते. अचानक एका ठिकाणी गाडीचा टायर पंक्चर झाला. गाडी थांबली. स्टेपनी काढणे, टायर बदलणे इत्यादी कामाकरिता अर्धा पाऊण तास सहज लागणार होता. तसाही काही अधिकार्यांना ब्रेक हवाच होता. ही संधी साधून काही लघुशंकेच्या निमित्ताने पाय मोकळे करायला, काही चहा टपरी शोधायला गेले. काही वेळांनी रतन टाटा कुठेच दिसत नाही म्हणून सर्व गाडीजवळ आले. तेथील दृश्य पाहून सर्व अधिकार्यांना अक्षरशः घाम फुटला. चाक बदलवून झाले होते. ड्रायव्हर नट पक्के करत होता. रतन टाटा गाडीच्या खाली आडवे झोपून जॅक ढिला करून काढत होते. ते बाहेर आले तेव्हा कपडे खराब झाले होेते. टाय विस्कटला होता. ड्रायव्हरला मदत करण्याची माणुसकी, संवेदनशीलता अध्यक्षपदापेक्षा मोठी ठरली. न सांगता अधिकार्यांना एक उदाहरण घालून दिले.जो प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करू शकतो, तोच खरे नेतृत्व करू शकतो. ते काम करण्याची सर्व प्रकारची क्षमता व पात्रता नेतृत्वाजवळ असावी लागते. केवळ आदेश देणे व बाकी काम करत आहेत की नाही हे पाहणे, एवढेच पदाधिकार्याचे काम असते, असा अनेकांचा गैरसमज असतो. जेव्हा फक्त सुपरवायझरी स्टाफ वाढतो, तेव्हा अपेक्षेप्रमाणे परिणाम कधीच निघत नाहीत. भारतात हीच मनोवृत्ती प्रशासनात असल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नेता कसा असावा (Neta Ksa Asava) 

एका कारखान्यात एक यंत्र खराब झाले. ते नीट चालत नव्हते. तेथील सुपरवायझरने बरेच प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. बाहेरून एक अनुभवी तज्ज्ञ बोलाविण्यात आला. तो आपले साहित्य घेऊन आला. त्याने ते मशीन चालू केले. वीस मिनिटे तो फक्त सर्व बाजूंनी कान देऊन आवाज ऐकत होता. निरीक्षण करत होता. त्यानंतर त्याने हातोडा काढला एका विशिष्ट ठिकाणी ठोकले आणि काय आश्चर्य, ते मशीन व्यवस्थित काम करायला लागले. त्याने दहा हजाराचे बील पाठवले. सुपरवायझरला ते पटले नाही. फक्त हातोडा मारायचे दहा हजार. त्याने तपशीलवार बील मागवले. दोन रुपये हातोडा मारण्याचे व हातोडा कोठे मारायचा हे ठरविण्याचे नऊ हजार नऊशे अठ्यांनऊ रुपये. ही असते सुपर व्हिजन, जी सुपरवायझरला आवश्यक असते. नेतृत्वाला नेमकी समस्या कोठे आहे, त्याकरिता काय करावे लागेल याचे ज्ञान आवश्यक असते. कोठेही हातोडा मारून चालत नाही.

नेता कसा असावा (Neta Ksa Asava) 

सर्वत्र सक्षम नेतृत्व असल्याशिवाय समाजजीवनात, प्रशासनात परिवर्तन येऊच शकत नाही. ‘योगः कर्मसु कौशलम्’ ही योगाची व्याख्या श्रीकृष्णाने केली आहे. कर्म कौशल्याने करण्याकरिता मन, मेंदू आणि हृदय तल्लीनतेने व एकाग्रतेने वापरावे लागते. फक्त आदेश देणे, वरच्या सूचना खाली पाहोचविणे या करिता फार क्षमतेची गरज नसते. ‘ग्रेट लिडर्स आर ग्रेट टिचर्स’, असे म्हणतात. आपल्यासारखीच सक्षम माणसे जो तयार करू शकतो, तोच खरा नेता असतो. शिवाजी महाराज प्रत्यक्ष सेनेसोबत स्वतः लढणारे नेते होते. म्हणूनच ते यशस्वी झाले. जिवाला जीव देणारी माणसे त्यांनी तयार केली. आज आपला देश नवी झेप घेण्याकरिता सिद्ध होत आहे. अशा वेळी सर्वत्र क्षमतावान नेतृत्वाची गरज आहे. त्याकरिता नेतागिरी सोडून या योगाची साधना करावी लागेल.

(These Content is from Facebook Page of)

Post a Comment

0 Comments